अर्थ : एखाद्या प्रकारचे कार्य किंवा व्यवहार आरंभ करणे.
उदाहरणे :
तो भावाभावांत भांडण लावतो.
अर्थ : एखाद्या प्रक्रियेत लागणे.
उदाहरणे :
घरी फोन लाव.
अर्थ : चष्मा इत्यादी धारण करणे.
उदाहरणे :
हल्ली लहान-लहान मुलेदेखील चष्मा लावतात.
अर्थ : दार इत्यादि बंद करणे.
उदाहरणे :
त्याने आत जाताना दार लावून टाकले
लावले.
अर्थ : शिजण्यासाठी चुलीवर वा गॅसवर ठेवणे.
उदाहरणे :
गॅसवर डाळ ठेवली आहे.
भात लावला आहे.
समानार्थी : ठेवणे
अर्थ : एखाद्या ठिकाणी वाहन थांबवणे.
उदाहरणे :
वाहन चालकाने गाडी मैदानात लावली.
अर्थ : विशिष्ट मात्रेत एखादी वस्तू रोज येईल अशी व्यवस्था करणे.
उदाहरणे :
आम्ही वालणाचे दूध लावले आहे.
अर्थ : रोप इत्यादींचे रोपण करणे.
उदाहरणे :
माळ्याने बागेत गुलाबांची कलमे लावली.
समानार्थी : रोपण करणे, लागवड करणे
अर्थ : शिजवण्यासाठी विस्तवावर ठेवणे.
उदाहरणे :
आईने कूकर लावला.
अर्थ : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
उदाहरणे :
आधी तंबोरा नीट लाव.
समानार्थी : जुळवणे
अर्थ : एखादे द्रावण एखाद्या वस्तूवर बसेल अशाप्रकारे लावणे.
उदाहरणे :
दिवाळीत घराला रंग लावतात.
अर्थ : एखाद्यावर काहीतरी लावणे.
उदाहरणे :
पंचांनी त्या व्यक्तीवर दंड लावला.
अर्थ : एखादी वस्तू लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
दूरध्वनी लावण्यात जास्त वेळ लागणार नाही.
लावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laavne samanarthi shabd in Marathi.